महाराष्ट्र चार टप्प्यात अनलॉक होणार?; कसा असू शकतो ठाकरे सरकारचा प्लॅन, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 11:42 AM2021-05-24T11:42:28+5:302021-05-24T11:46:23+5:30

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे.

Maharashtra to be unlocked in four phases ?; How can there be a plan of state government, find out! | महाराष्ट्र चार टप्प्यात अनलॉक होणार?; कसा असू शकतो ठाकरे सरकारचा प्लॅन, जाणून घ्या!

महाराष्ट्र चार टप्प्यात अनलॉक होणार?; कसा असू शकतो ठाकरे सरकारचा प्लॅन, जाणून घ्या!

googlenewsNext

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दररोज ७० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील रविवारी माध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत महत्वाची माहिती दिली होती. 

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत कोरोनानं हातपाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. '१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील चिंताजनक नाही. त्यामुळे या भागातील निर्बंध १ जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्यानं मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जातील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, राज्य सरकार ४ टप्प्यात अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे. 

लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांना लॉकडाऊनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. 'कोरोना कमी होतोय हे नक्कीच. पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला'', असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.


 

Read in English

Web Title: Maharashtra to be unlocked in four phases ?; How can there be a plan of state government, find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.