मुंबई- धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांवरच जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना करण्यात येत असून, प्रचारसभेतही बोलू दिलं नसून दानवेंच्या दौ-यावेळी मला वगळलं, अशी खंत गोटे यांनी व्यक्त केली आहे. धुळे महापालिकेजी जबाबदारी महाजनांकडे का दिली, मी प्यादं बनण्याइतका लेचापेचा नाही. महाजनांकडे धुरा देऊन माझ्यावर अविश्वास दाखवला. धुळं म्हणजे जळगाव किंवा सांगली नाही. सुभाष भामरेंची पात्रता नसताना त्यांना पक्षानं तिकीट दिलं. सुभाष भामरे भाजपात गटबाजीचं राजकारण करतात. त्यामुळे 19 नोव्हेंबरला राजीनामा देण्यावर मी ठाम आहे. माझी खंत मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तरीही पुन्हा मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं तर जाईल, पण स्वतःहून जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपातून माझ्याविरोधात कट रचला जातोय- अनिल गोटे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 5:49 PM