Maharashtra Budget 2018 : अर्थमंत्र्यांनी एक तीळ सात जणांत वाटला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 01:53 PM2018-03-09T13:53:34+5:302018-03-09T16:49:42+5:30

केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच राज्य सरकारचा अर्थसंकल्पही बळीराजावर 'फोकस' करणारा असेल, हा अंदाज चुकीचा ठरवत...

Maharashtra Budget 2018: Finance Minister Sudhir Mungantiwar will present the budget | Maharashtra Budget 2018 : अर्थमंत्र्यांनी एक तीळ सात जणांत वाटला, पण... 

Maharashtra Budget 2018 : अर्थमंत्र्यांनी एक तीळ सात जणांत वाटला, पण... 

googlenewsNext

मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला.  सुधीर मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच राज्य सरकारचा अर्थसंकल्पही बळीराजावर 'फोकस' करणारा असेल, हा अंदाज चुकीचा ठरवत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सगळ्यांनाच थोडं थोडं देण्याचा प्रयत्न केला. राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचं सांगत, फार आशा न बाळगण्याचे संकेत त्यांनी कालच दिले होते. त्यानुसारच, कुठलीही नवी घोषणा न करता त्यांनी आधीच्याच घोषणांसाठी निधीचं वाटप केलं. अर्थात, एक तीळ सात जणांत वाटून घेण्याचा त्यांचा विचार उदात्त असला, तरी त्यातून सगळेच अर्धपोटी राहण्याची शक्यता वर्तवली जातेय.  

LIVE UPDATES :

  • वनक्षेत्रातल्या कामांसाठी 11 कोटी तर बफर झोन क्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद 
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 2 हजार 255 कोटी 40 लाखांची तरतूद
  • संकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी 20 कोटी रू. निधीची तरतूद
  • सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी 900 कोटी रू. निधीची तरतूद 
  • अल्पसंख्यांक योजनांसाठी 350 कोटींची तरतूद
  •  वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी पहिली भारतीय पाणबुडी उपलब्ध होणार
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किल्ल्याच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद 
  • न्यायालयाच्या इमारतींसाठी ७०० कोटींची तरतूद
  • गणपतीपुळे येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी 20 कोटींची तरतूद
  • विदर्भातील रामटेकच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद
  • सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाखांची तरतूद
  • दिव्यांगांना मोबाइल स्टॉल्स उभारून देण्यासाठी २५ कोटींची तरतूद
  • कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी २१ कोटी १९ लाख रुपयांची तरतूद
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेश्यालिटी हॉस्पिटल, २० कोटी रुपयांची तरतूद
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी १,५२६ कोटी रुपयाची तरतूद
  • गर्भवती गरीब महिलांसाठी ६५ कोटींची तरतूद

- शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आलेत. ३६ महिन्यांत काम पूर्ण होईल. ३०० कोटींची तरतूद. शिवस्मारकाची निविदा अंतिम करण्यात आली आहे.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद

- मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रोची कामं सुरु आहेत  

- सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न   

- सूत गिरण्यांना ३ रुपये प्रती युनिट वीज देण्याचे काम सरकार करेल  

- ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारण्यासाठी 17 हजार कोटी रुपयांची तरतूद 

- पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांना ८,२३३ कोटी रुपयांची तरतूद
- जलयुक्त शिवार याजनेसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद. गेल्या दोन वर्षांत ११ हजार गावं झाली स्वयंपूर्ण
- बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना विशेष सूट देणार
- सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद
- कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी 60 कोटींची भरीव तरतूद

- समुद्र किना-यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविणार. 
- सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
 - कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद

- मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण. ह्यासाठी 160 कोटी एवढा निधी. 

- शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार 

- शेतक-यांना पीक व पशुधन याबरोबर उत्पन्नाचा नवीन स्रोत म्हणून वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ह्यासाठी 15 कोटी रू. निधी प्रस्तावित. 

- शेतमाल साठवणूक सुविधा व प्रतवारीसाठी प्राधान्य देण्यासाठी नवीन योजना, बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसवणार व त्यासाठी 25 टक्के अर्थ सहाय्य पुरविणार.

- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद
- आतापर्यंत ३५.६८ लाख शेतकऱ्यांचं १३ हजार ७८२ कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं 

- राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजार पोर्टलवर आणणार
- राज्यातील ६०९ एसटी बस स्थानकांच्या पुनर्बांधणीसाठी ४० कोटींची तरतूद. एसटीच्या माध्यमातून शेतमाल वाहून नेण्याची योजना विचाराधीन.

-जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटींची तरतूद. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी उपाययोजना.

- मानव विकास मिशनसाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद.

- राज्यात खासगी सहभागातून ६ कौशल्य विकास विद्यापीठांची स्थापना. स्कील इंडियासाठी राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देणार.

- चक्रधर स्वामी यांच्या नावानं अध्यासन केंद्राची स्थापना

- एप्रिल २०१८ पासून समृद्धी महामार्गाचं काम सुरू होणार. भूसंपादनाची ६४ टक्के प्रक्रिया पूर्ण.

- समृद्धी महामार्गाच्या अंतर्गत गोदामं, शीतगृह उभरण्याचा मानस

- महापुरुषांचं साहित्य वेब पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटींची तरतूद.

- 7000 किमी रस्त्यांसाठी 2255 कोटी निधीची तरतूद

- 4509 किमीवरून 3 वर्षांत 15, 404 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले.

- रस्त्याच्या दुपदरीकरणाचे 26  हजार कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर.

- विद्यावेतन 4 हजार रुपयांपर्यंत वाढवलं.

- महाराष्ट्रात 300 मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार. ग्रीन सेस फंडातून 350 कोटींची तरतूद.

- गृह विभागाच्या विकासासाठी 13 हजार 385 कोटींची तरतूद 
- पोलिसांच्या बळकटीकरणासाठी 13 हजार 385  कोटींची तरतूद 
- मुंबई मेट्रोसाठी 130 कोटींची तरतूद. नवी मुंबई, नागपूर, पुणे - 90 कोटी
 




 



 






Web Title: Maharashtra Budget 2018: Finance Minister Sudhir Mungantiwar will present the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.