Join us

Maharashtra Budget 2021: मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या काय महागलं अन् काय केल्या घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 4:45 PM

Maharashtra Budget 2021: राज्यात नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. जाणून घ्या..

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला. अर्थसंकल्पातअजित पवार यांनी अनेक घोषणा केल्या. पण राज्यात नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. राज्यात आज देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅटमध्ये ६० टक्क्यांवरुन ६५ टक्के करण्यात आला आहे. तर सर्व प्रकारच्या व्हॅटचा दर ३० टक्क्यांवरुन ४० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता मद्य महागणार आहे. (Maharashtra Budget 2021 five percent increase in VAT on alcohol)

महिलेच्या नावानं घर घेतल्यास 'स्टॅम्प ड्युटी'त सूट अन् विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; महिला दिनी अर्थमंत्र्यांचं गिफ्ट

राज्याचं करसंकलनाचं उद्दिष्ट आणि आर्थिक गणित बसवण्यासाठी अजित पवारांनी मद्यावर करवाढ प्रस्तावित केली आहे. “देशी मद्याचे ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, देशी ब्रँडेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति प्रूफ लिटर यापैकी जे अधिक असेल तो लागू करण्यात येईल. त्यातून राज्याला अंदाजे ८०० कोटी अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. तसेच, मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ख नुसार सध्याचा मूल्यवर्धित दर ६० टक्क्यांवरून ६५ टक्के, तर मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१/५ नुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर ३५ वरून ४० टक्के वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे राज्याला १ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल”, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

काय आहेत महत्वाच्या घोषणा?>> राज्यात महिलांच्या नावे घर घेण्यात आल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्क्यांची सूट>> इयता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास आणि १५०० नव्या हायब्रीड बसेसची सुविधा>> शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होणार>> मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी “तेजस्विनी योजनेत” आणखी विशेष महिला बस उपलब्ध करुन देणार.>> विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरिता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना” राबविण्याचे प्रस्तावित.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रअर्थसंकल्प