Join us

Maharashtra Budget 2023 : २ कोटी लोकसंख्येच्या मुंबईत MBBS' च्या फक्त १०० जागा; अँड आशिष शेलारांनी वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 5:52 PM

आज विधनसभेत खातेनिहाय चर्चा सुरू असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील काही प्रश्नांवरुन सभागृहाचे लक्ष वेधले.

मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज विधनसभेत खातेनिहाय चर्चा सुरू असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील काही प्रश्नांवरुन सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईची लोकसंख्या सुमारे २ कोटी असताना एमबीबीएससाठी स्थानिक विद्यार्थ्यांना फक्त १०० जागा उपलब्ध होतात, पर्यायाने मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात फॅमिली फिजिशियन उपलब्ध होत नाहीत, याकडे भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.

"सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भीतीनेच मंत्रालयात लगबग सुरू", नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना टोला

विधानसभेत अर्थसंकल्पाची खातेनिहाय चर्चा सुरु असून, या चर्चेत सहभागी होताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील एका गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत जनरल फिजिशियनची संख्या अपूरी आहे. संस्थेने शोधले आहे त्यानुसार मुंबईतील एकुण ७०० एमबीबीएस जागेपैकी ६०० जागा गुणवत्तेनुसार तर केवळ १०० जागा स्थानिक विद्यार्थ्यांना मिळतात. त्यातील ६० विद्यार्थीच मुंबईत प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देतात.

नवी दिल्लीची लोकसंख्या अडिच कोटी असताना स्थानिक विद्यार्थ्यांना ८०० जागा मिळतात,चेन्नईची लोकसंख्या १ कोटी जागा ३००,  कलकत्ता दिड कोटी जागा ४०० तर मुंबईची लोकसंख्या अडिच कोटी असतना केवळ १०० जागा उपलब्ध होतात. त्यामुळे त्याचे परिणाम आरोग्य सेवेवर होतात, गुणवत्ता हा निकष असायलाच हवा, संपूर्ण देशातील विद्यार्थी कुठेही शिकू शकतो पण  याबाबत मुंबईत असलेली विषमता दूर करण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. 

दरम्यान, अन्न पुरवठा विभागावर बोलताना त्यांनी मुंबईत रेशनिंग दुकाने कमी होत असून भाडे परवडत नाही म्हणून दुकाने कमी होत आहेत त्यामुळे सरकारने रेशनिंग दुकानांना भाडे वाढवून द्यावे, तसेच वस्तीमध्ये फिरती रेशनिंग दुकाने सुरु करण्यात यावी, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

टॅग्स :भाजपाआशीष शेलार