Join us

Maharashtra Budget Live Updates : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात स्मारकांना किती पैसे दिले? वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 4:14 PM

Maharashtra Budget Live Updates: राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुरू आहे.

मुंबई- Maharashtra Budget Live Updates: राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात अर्थसंकल्प सादर केला, राज्यातील शेतकरी, महिला, आशा स्वयंसेविकांसाठी, अंगणवाडी सेविकांना अनेक घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची घोषणा केली आहे. तसेच राज्यात अनेक स्मारकांसाठीही निधीची घोषणा केली. 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारकासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. यात इंदूमिल येथील स्मारकासाठी ३४९ कोटी रुपये अगोदर दिले आहेत, यात आता ७४१ कोटी देणार असल्याची घोषणा केली. तसेच  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी देण्यात आला आहे. 

Maharashtra Budget Live Updates: देवेंद्र फडणवीसांची महत्वकांक्षी योजना पुन्हा सुरू होणार! ५,००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार २.०

पुणे येथील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकासाठीही निधीसाठी ५० कोटी रुपये जाहीर केले आहेत. तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाशाटी २५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ३५१ कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. तसेच अमरावती येथील स्व. रा. सू. गवई स्मारकासाठी २५ कोटी रुपये जाहीर केले आहेत. तर नांदेड येथील विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारकासाठी निधी जाहीर केला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरुड येथे माजी मंत्री स्व. शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकासाठी २० कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारने आज अर्थसंकल्पात राज्यात ८ स्मारकांसाठी निधी जाहीर केला आहे. यात एकुण १२१२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. (Maharashtra Budget Live Updates)

टॅग्स :अर्थसंकल्प 2023देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे