Maharashtra Budget Live Updates: "अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते", एकनाथ शिंदेंचा टोला
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:31 PM2023-03-09T12:31:22+5:302023-03-09T16:40:59+5:30
मुंबई - राज्याचे आर्थिक चित्र ऑल इज वेल नसून आव्हानांचा डोंगर उभे असल्याचे चित्र आर्थिक पाहणी अहवालात समोर आले ...
मुंबई - राज्याचे आर्थिक चित्र ऑल इज वेल नसून आव्हानांचा डोंगर उभे असल्याचे चित्र आर्थिक पाहणी अहवालात समोर आले असतानाच उद्योग क्षेत्राने भरारी घेतल्याचे आशादायी चित्रदेखील आहे. गेल्यावर्षी ठेवलेले १२.१ टक्के आर्थिक विकासाचे उद्दीष्ट साध्य करण्यात अपयश आले असून हा दर ९.१ टक्क्यावर आला आहे आणि २०२२-२३ मध्ये तो केवळ ६.८ टक्के इतकाच असेल असा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं बजेट आज सादर होत असून अर्थमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
विधानसभेत आज सकाळपासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन घमासान पाहायला मिळत आहे. त्यामुळेच, शेतकऱ्यांना आजच्या बजेटमध्ये काय मिळणार, बळीराजा सुखावणार का, हेही बजेट सादर केल्यानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात होईल.
LIVE
07:51 PM
राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकाभिमुख घोषणांचा पाऊस - धनंजय मुंडे
मुंबई - आज जाहीर करण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आहे! मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या पंचसुत्रीची 'पंचामृत' या गोड नावाखाली केलेली नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
06:37 PM
अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा' - रविकांत तुपकर
सोयाबीन-कापसाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव खाजगी बाजारात नाही. त्यामुळे आज ७० ते ८०% सोयाबीन-कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचे विशेष पॅकेज घोषित करणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. जर शेतकऱ्यांना खरंच मदत करायची असेल तर त्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे आहे. तर राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा' अशी टीका रविकांत तुपकर यांनी सरकारवर केली आहे.
06:29 PM
राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प - चंद्रकांत पाटील
मुंबई : सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर केला. हा सामान्य जनतेसाठीचा 'महाअर्थसंकल्प' आणि 'जनसंकल्प' असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
06:09 PM
तळागाळातील लोकांना समृद्ध करणारा अर्थसंकल्प - नरेश म्हस्के
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ठाण्यात शिवसैनिकांनी जल्लोष करत या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, महिला, नोकरदार, विद्यार्थी आणि तरुण वर्गाला दिशा देणारा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले. शिंदे - फडणवीस सरकारचा तळागाळातील लोकांना समृद्ध करणारा हा अर्थसंकल्प असून दिलासादायक अर्थसंकल्प असल्याची भावना म्हस्के यांनी व्यक्त केली.
05:59 PM
‘फिल गुड फॅक्टर’ निर्माण करण्याचा प्रयत्नः अशोक चव्हाण
राज्य सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘फिल गुड फॅक्टर’ निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ न ठेवता लोकांना मृगजळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प कितपत प्रत्यक्षात उतरेल, यावर प्रश्नचिन्ह असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
05:25 PM
फडणवीसांचा अर्थसंकल्प हा अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा - नाना पटोले
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून प्रत्यक्षात काहीही नाही केवळ मोठं मोठ्या आकड्यांची घोषणा आहे. शेतमालाच्या हमीभावाबद्दल अर्थसंकल्पात काहीच नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काहीच घोषणा केलेली नाही तसेच जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा असून अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
05:22 PM
अर्थसंकल्पनातून शेतकऱ्यांची निराशा - अजित नवले
अर्थसंकल्पीय अधिवेशनातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली असल्याचं शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलेले आहे. ज्या केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेत आता राज्य सरकार भर टाकणार आहे. ही सन्मान योजना कधीही शेतकऱ्यांनी मागितलीच नाही. सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचे कल्याण होणार नाही तर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा देखील शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितले आहे.
05:03 PM
गरिबाच्या भाकरी, भक्ती आणि भविष्याला मोल देणारा अर्थसंकल्प - आशिष शेलार
राज्यातील गरिब, कष्टकरी, कामगार, श्रमिक यांच्या घामाला, श्रमला, दैवतांना आणि त्याच्या भाकरीला मोल देणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. त्याबद्दल भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.
04:38 PM
जनभागीदारीतील अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या पर्यावरण पूरक विकासाचा आराखडाच - प्रदीप पेशकार
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येय युक्त असलेला अर्थसंकल्प खरोखर जनभागीदारीतून तयार झाला.
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास.
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
खऱ्या अर्थाने अंत्योदयाचा विचार घेऊन केलेला अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रदीप पेशकार यांनी दिली आहे.
04:36 PM
अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते - एकनाथ शिंदे
अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समावेश आहे. अभ्यासपूर्ण आणि सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आहे. लेक लाडकी योजना पहिल्यांदाच सुरू केली आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. अडीच वर्ष जे बंद होतं, त्या सर्व घटकांना चालना मिळेल.तरुणांना स्वत:च्या पायावर उभा करणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहे. तसेच, अर्थसंकल्प सादर झाला, तेव्हा विरोधकांचे चेहरे बघण्यासारखे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
03:30 PM
आजचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला - अजित पवार
राज्य सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे, अर्थसंकल्पात वास्तावाचं भान नाही. केवळ घोषणांचा सुकाळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली
03:08 PM
राज्यातील विमानतळांचा विकास होणार…
राज्यातील विमानतळांचा विकास होणार…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
– शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी
– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी ७३४ कोटी
– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
– पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी#MahaBudget2023
03:05 PM
शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
- विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपये देणार
03:00 PM
विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ
विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ
विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार
02:56 PM
ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगार निर्मितीस चालना देण्याकरता आमच्या शासनाने सन २०१८ मध्ये संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला मंडळाची स्थापना केली होती याकरिता २५ कोटी रुपये प्रस्तावित आहे.#MahaBudget2023
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
02:51 PM
बार्टी, सारथीसह संस्था आणि महामंडळांद्वारे जनतेचा विकास
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या सर्व महामंडळांकरता पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे, लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार व नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळअंतर्गत स्थापना करण्यात येईल. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल देण्यात येईल.
02:48 PM
4 कोटी महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार
महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील.#MahaBudget2023
02:46 PM
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे
दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
- या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
02:44 PM
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार
- वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार
02:43 PM
महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
- महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
- त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
- नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
- मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
- राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
02:41 PM
निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
- अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान
02:39 PM
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
02:35 PM
महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट
सारे काही महिलांसाठी...
- राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
02:34 PM
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची...
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
02:32 PM
मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी
- मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी
- बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी
- धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी
02:32 PM
असे असतील नदीजोड प्रकल्प...
- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
- नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्यातील पाणी वापरणार
- मुंबई, गोदावरी खोर्यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
- वैनगंगा खोर्यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ
02:32 PM
शेतकर्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या
- वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्यांना लाभ
- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत
02:30 PM
मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष विमा
- प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष
- मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली
- त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ
- वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार
- यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद
- पारंपारिक मासेमारी करणार्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा
02:26 PM
धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार
विकास महामंडळाची स्थापना करणार
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
- 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- अहमदनगर येथे मुख्यालय असणार
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी
02:25 PM
शेतमाल विक्रीसाठी आलेल्या, शेतकर्यांना निवारा-भोजन
- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना सुविधा
- शेतकर्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता
02:24 PM
शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी, थेट रोखीने आर्थिक मदत!
- विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार
02:24 PM
नागपुरात कृषी सविधा केंद्र,विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद
02:23 PM
सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्रस्थापन करणार
- आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार
02:23 PM
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, ३ वर्षात १ हजार कोटी निधी
- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी
02:22 PM
अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी सानुग्रह योजनेत वाढ
गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ
02:19 PM
अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे सादरीकरण
बजेटचे सादरीकरण लाईव्ह, पाहा -
02:18 PM
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान
- राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
02:16 PM
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
02:15 PM
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित
1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5) पर्यावरणपूरक विकास
02:14 PM
शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये अनेक योजना
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ अमृत योजना सांगताना पहिले अमृत हे शेतकऱ्यांच्या हितासाठीचं असल्याचं सांगितलं. त्यानुसार, केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेत वाढ करण्यात आली. त्यात, आता राज्य सरकारच्यावतीने ६ हजार रुपये वार्षिक निधी देण्यात येईल. त्यामुळे, ही रक्कम १२ हजार एवढी होणार आहे.
02:08 PM
शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करणार
किल्ले शिवनेरीवर संग्राहलय उभारणार आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू करणार आहे.
02:05 PM
पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन
पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्प वाचन. तुकोबारायांच्या ओवीचा उल्लेख करत अर्थसंकल्प वाचनाला मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली.
12:59 PM
अर्थसंकल्प घेऊन विधिमंडळात आले अर्थमंत्री
अर्थसंकल्पाचा टॅब घेऊन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे विधिमंडळात आगमन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले, त्यानंतर विधीमंडळात प्रवेश