Maharashtra Budget Session 2023: एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना डिवचलं; सभागृहात एकच पिकला हशा, उदय सामंतांची रिॲक्शन बघा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:33 PM2023-02-28T16:33:32+5:302023-02-28T17:00:10+5:30

Maharashtra Budget Session 2023: अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदर प्रश्न सभागृहाच मांडण्यास सुरुवात केली.

Maharashtra Budget Session 2023: As CM Eknath Shinde taunted Congress leader Nana Patole And everyone started laughing | Maharashtra Budget Session 2023: एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना डिवचलं; सभागृहात एकच पिकला हशा, उदय सामंतांची रिॲक्शन बघा...!

Maharashtra Budget Session 2023: एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना डिवचलं; सभागृहात एकच पिकला हशा, उदय सामंतांची रिॲक्शन बघा...!

googlenewsNext

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. 

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदर प्रश्न सभागृहाच मांडण्यास सुरुवात केली. मात्र सभागृह अध्यक्षांनी हा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडून झाल्याचे लक्षात आणून दिले. मात्र तरीही नाना पटोले अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडत होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उठले आणि अंगणवाडी सेविकांबाबत अजितदादा म्हणाले होते. तुमचा विरोधीपक्ष नेता एकच आहे की वेगळा आहे?, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. 

एकनाथ शिंदे म्हणाले, अहो नाना, मी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सभागृहात उत्तर दिलं होतं. आता अशी परिस्थिती आलीय की, तुम्ही सभात्याग करा, असं म्हटलं तरी कोणी गेलं नाही...एकनाथ शिंदे असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. एकनाथ शिंदेंनाही हसू आवरलं नाही. यावेळी एकनाथ शिंदेंच्या मागे बसलेले मंत्री उदय सामंतही त्यांच्याजवळ असलेलं पेपर चेहऱ्यावर ठेऊन हसू लागले. यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार खूप संवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कुणी केलं राज्याला माहिती आहे. १२ हजार कोटी रुपये आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिले, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

दरम्यान, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली. मात्र एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण सुरु केले असता विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्वरित उठले आणि एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री जबाबदारीने सांगताय की कांद्याची खरेदी सुरु झालीय. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे, हे एकदा ठरवलं पाहिजे. मुख्यमंत्री सांगताय की नाफेडने कांदा खरेदी सुरु केलीय, मग विरोधकांकडे वेगळी माहिती असेल तर त्यांनी हक्काभंग आणावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Maharashtra Budget Session 2023: As CM Eknath Shinde taunted Congress leader Nana Patole And everyone started laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.