मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात त्यांनी चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी अजित पवार यांनी केली.
एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना डिवचलं; सभागृहात एकच पिकला हशा, उदय सामंतांची रिॲक्शन बघा...!
अजित पवारांनी पदवीधर निवडणुकांच्या निकालावरुनही अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर सहा महिन्यांनी पदवीधर निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सुशिक्षित शिक्षकांनी मतदान केलं. या निवडणुकीत मतदारांनी तुम्हाला नाकारलं आणि हे एका भागात झालं नाही. अमरावती विभागात देखील समोर आलेल्या निकालाने धाबे दणाणले. नागपूरात देखील भाजपाचा पराभव झाला. सत्ताधारी पक्ष केंद्रात सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे. मात्र तरीदेखील भाजपाचं दुसऱ्या पक्षातील आमदारांवर डोळा असतो, असं अजित पवार म्हणाले. तसेच दुसरा आमदार कसा आमच्याकडे येईल, असं भाजपा बघत असतं, ही अवस्था भाजपाची झालीय, असं अजित पवारांनी म्हटलं.
मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी; फडणवीस तडक उठले अन् थेट चॅलेंज दिले!
अजित पवारांच्या या विधानावर लगेच सभागृहात समोर बसलेले मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन काहीतरी बोलू लागले. त्यावर गिरीशजी एक मिनिट...आता माझं भाषण होतं ना...अंकल अंकल...अंकल काकींना सांगेल हा...., असा टोला अजित पवारांनी गिरीश महाजन यांना लगावला. अजित पवारांच्या या मजेशीर वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील आनंद लुटला. काही वेळेनंतर अजित पवारांनी गिरीश महाजन यांना अंकल म्हटल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हातवारे करुन गिरीश महाजन यांना दाखवले.
तुमचा विरोधीपक्ष नेता एकच आहे की वेगळा आहे?
अजित पवार यांनी अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सदर प्रश्न सभागृहाच मांडण्यास सुरुवात केली. मात्र सभागृह अध्यक्षांनी हा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडून झाल्याचे लक्षात आणून दिले. मात्र तरीही नाना पटोले अंगणवाडी सेविकांबाबत प्रश्न मांडत होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उठले आणि अंगणवाडी सेविकांबाबत अजितदादा म्हणाले होते. तुमचा विरोधीपक्ष नेता एकच आहे की वेगळा आहे?, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, अहो नाना, मी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सभागृहात उत्तर दिलं होतं. आता अशी परिस्थिती आलीय की, तुम्ही सभात्याग करा, असं म्हटलं तरी कोणी गेलं नाही...एकनाथ शिंदे असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. एकनाथ शिंदेंनाही हसू आवरलं नाही. यावेळी एकनाथ शिंदेंच्या मागे बसलेले मंत्री उदय सामंतही त्यांच्याजवळ असलेलं पेपर चेहऱ्यावर ठेऊन हसू लागले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"