Maharashtra Budget Session:...तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:36 PM2022-03-07T12:36:55+5:302022-03-07T12:37:25+5:30

गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा फोन पोलीस आयुक्तांना गेला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी विधानसभेत केला.

Maharashtra Budget Session: MLA Ravi Rana Angry in Vidhasabha over registered case against himself | Maharashtra Budget Session:...तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणांचा आक्रोश

Maharashtra Budget Session:...तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणांचा आक्रोश

Next

मुंबई – अमरावतीमधील शाईफेक प्रकरण विधानसभा सभागृहात चांगलेच गाजले. आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला. त्यावरून भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एखादा आमदार दिल्ली असताना त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. महाराष्ट्रात असं होणं दुर्देव आहे. एखाद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काय गुन्हा केला तर अजितदादांना फासावर चढवणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत विचारला.

फडणवीसांनंतर आमदार रवी राणा(MLA Ravi Rana) यांना सभागृहात बोलण्याची संधी दिली. तेव्हा रवी राणा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या संगतमताने छन्नी हातोड्याने काढून तो पुतळा गोदाऊनमध्ये टाकला असेल तर त्यावर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. संतप्त शिवभक्तांनी मनपा आयुक्तांवर शाईफेक केली त्याचा निषेध करतो परंतु त्यावेळी मी दिल्लीत असताना माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारमधील प्रमुख लोकांच्या दबावाखाली माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आला. रात्री दीडच्या सुमारास माझ्याघरी १००-१५० पोलीस घुसून माझ्या घरच्यांना त्रास दिला असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा फोन पोलीस आयुक्तांना गेला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आर आर पाटीलसारखे गृहमंत्री राज्याला हवेत. सचिन वाझेसारखे पोलीस अधिकारी राज्य निर्माण करत असतील तर तुमचाही अनिल देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याविरोधात ३०७,३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांवर इतका दबाव टाकला की रवी राणा जिथं दिसेल त्याला गोळी मारा असं सांगण्यात आले. जर मी खोटे बोलत असेन तर मला फाशी द्या, मी विधानसभेत फाशी घेईन यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पोलीस बेछूट होतील - फडणवीस

अमरावतीत जो काही प्रकार घडला त्यावरून दिल्लीत असलेल्या आमदारावर ३०७ चा गुन्हा कोणाच्या दबावाखाली लावण्यात आला? बेकायदेशीरपणे ३०७ चा गुन्हा ज्यांनी लावला त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. जर पोलीस बेछूट झाले तर या राज्यात कायदा कुठेच उरणार नाही. त्यामुळे रवी राणा यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  

Web Title: Maharashtra Budget Session: MLA Ravi Rana Angry in Vidhasabha over registered case against himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.