मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरेसुद्धामंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात 25 कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तर 10 राज्यमंत्री असतील.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र लोकमतच्या हाती लागलं असून त्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी देण्यात आली आहे. या यादीत 25 व्या नंबरवर आदित्य ठाकरेंचं नाव आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे हेही मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. उद्धव ठाकरेंच्या सहीची ही यादी हाती लागली आहे. आदित्य यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं होतं, शेवटपर्यंत कोणालाही आदित्य मंत्रिमंडळात येणार आहेत याचा सुगावा लागू दिला नव्हता. मात्र, राज्यपालांकडे जेव्हा रात्री उशिरा यादी गेली, त्यात आदित्य ठाकरेंचे नाव कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत सगळ्यात शेवटचे नाव असल्याचे समजते.
* उपमुख्यमंत्री - अजित पवार
* 25 कॅबिनेट मंत्री
अशोक शंकरराव चव्हाणदिलीप वळसे पाटीलधनंजय मुंडेविजय वडेट्टीवारअनिल देशमुखहसन मुश्रिफश्रीमती वर्षा गायकवाडडॉ.राजेंद्र शिंगणे नवाब मिलकराजेश टोपेसुनिल केदारसंजय राठोड गुलाबराव पाटीलअमित विलासराव देशमुखदादा भिसेजितेंद्र आव्हाडसंदिपान भुमरेआदित्य ठाकरेअसलम शेखशंकरराव गडाखके. सी. पाडवीउदय सामंतअनिल परबयशोमती ठाकूरबाळासाहेब पाटील
* 10 राज्यमंत्रिपद
अब्दुल सत्तारसतेज पाटीलशंभूराज देसाईबच्चू कडूविश्वजीत कदमदत्तात्रय भरणेआदिती तटकरेसंजय बनसोडेप्राजक्त तनपुरेराजेंद्र पाटील यड्रावकर