Join us

परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 2:28 PM

Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Cabinet Meeting Decision: राज्यात अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सरकारच्या वतीने आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण आणणार असल्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झालेले निर्णय

- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार (वित्त विभाग)

- महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार (सामाजिक न्याय)

- राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार (सहकार व वस्त्रोद्योग)

- कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.(ऊर्जा विभाग)

- इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार (कामगार विभाग)

- बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण (सामाजिक न्याय)

- राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार (विधी व न्याय विभाग )

- अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय (पशुसंवर्धन विभाग)

 

टॅग्स :राज्य सरकारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार