शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:00 AM2018-10-21T06:00:50+5:302018-10-21T06:00:56+5:30

शिक्षण, रोजगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra chain of human chain against education market! | शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी!

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी मानवी साखळी!

Next

मुंबई : शिक्षण, रोजगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी वाढती बेरोजगारी व शिक्षण बाजारीकरणाविरुद्ध रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवी साखळी हे निषेधात्मक आंदोलन असून ते महाराष्ट्रातील ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.या अभिनव आंदोलनात त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात ५० मानवी साखळी संयोजन आयोजन समितीची बांधणी झाली असून शेकडो विद्यार्थी, युवक,महिला,नागरीक,शिक्षणप्रेमी,अनेक शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक या मानवी साखळीमध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारने लाखो विद्यार्थी-युवकांना शिक्षण आणि रोजगार पुरविण्याची जबाबदारी पार पाडावी.याची सत्ताधारी वर्गाला जाणीव करून देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी मिळून कोणत्याही संघटनेचा अथवा पक्षाचा झेंडा अथवा बॅनर न घेता महाराष्ट्रभर मानवी साखळी आयोजित करण्यात आलेली आहे.







 

Web Title: Maharashtra chain of human chain against education market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.