Join us

उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह यांचं मोठं योगदान; एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 3:53 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

Mulayam Singh Yadav Death: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना २ ऑक्टोबर रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तब्येत नाजूक होती आणि कोणतीही सुधारणा झाली नाही. 'सपा'चे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनी आपल्या कुटुंबासाठी मोठा राजकीय वारसा मागे सोडला आहे.

मुलायम सिंह यादव आपल्यामागे सोडून गेले 'इतक्या' कोटींची संपत्ती, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स...

मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंहांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असून १९९७ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. मुलायम सिंह यांच्या निधानानंतर देशातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुलायम सिंह यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

देवेगौडा नाही, मुलायम सिंहच पंतप्रधान होणार होते, तयारीही झालेली, पण... दोनदा संधी हुकली

एकनाथ शिंदे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री व समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे खूप मोठे योगदान आहे.मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे ९ जुलै २०२२ रोजी निधन झाले होते. त्यांना रक्तदाबासह मधुमेहाचा त्रास सुद्धा होता. साधना गुप्ता या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्या औरैया येथील विधुना येथील रहिवासी होत्या. १९८० मध्ये त्यांची पहिल्यांदा मुलायम सिंह यादव यांच्यासोबत भेट झाली होती. साधना गुप्ता यांचेही यापूर्वी लग्न झाले होते. पण, त्या आपल्या पतीसोबत जास्त काळ राहिल्या नाहीत आणि चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता. ज्यानंतर साधना गुप्ता आणि मुलायम सिंह यादव यांचे लग्न झाले. साधना गुप्ता या मुलायम सिंह यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान होत्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुलायम सिंह यादवएकनाथ शिंदे