Presidential Election: एनडीएच्या द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती; एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:57 PM2022-07-21T20:57:34+5:302022-07-21T20:57:48+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde has congratulated the new President Draupadi Murmu | Presidential Election: एनडीएच्या द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती; एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले...

Presidential Election: एनडीएच्या द्रौपदी मुर्मू नव्या राष्ट्रपती; एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट, म्हणाले...

Next

नवी दिल्ली/मुंबई- संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार असलेल्या यशवंत सिन्हा (Yashwant Sinha)  यांचा पराभव केला आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं मिळाली आहेत. 

एनडीएनं राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी महिलेचा चेहरा देत धक्कातंत्र आजमावलं होतं. देशातील आदिवासी समाजाचा सन्मान म्हणून विरोधकांमधील काही पक्षांनीही मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली असं म्हणता येईल. 

द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट केलं आहे. भारतीय प्रजासत्ताकच्या १५ व्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी_मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक शुभेच्छा, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच मुर्मू यांनी आघाडी घेतली होती ती अखेरच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यापर्यंत कायम राखली. पहिल्या टप्प्यात मुर्मू यांना ५४० मतं मिळाली होती. या मताचे मूल्य ३,७८,००० इतकं होतं. तर विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मतं मिळाली होती. त्यांच्या मतांचं मूल्य १,४५,००० इतकं होतं. 

दुसऱ्या फेरीत मुर्मू यांना १३४९ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीत विजयावर शिक्कामोर्तब करत मुर्मू यांची विजयाची आघाडी एकूण ८१२ मतांपर्यंत पोहोचली. तर यशवंत सिन्हा यांना ५२१ मतं पडली. तिन्ही फेरीत एकूण मिळून द्रौपदी मुर्मू यांना २१६१ मतं मिळाली तर यशवंत सिन्हा यांना १०५८ मतं मिळाली. 


Web Title: Maharashtra Chief Minister Eknath Shinde has congratulated the new President Draupadi Murmu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.