मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईच्या' 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाची मुख्यमंत्र्यांनी मनोभावे पूजन करून स्थापना केली. यावेळी त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जगभरात राहणाऱ्या सर्वांसाठी गणेशपर्व हे आनंदाचे पर्व आहे. सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात याचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाने सर्वांना आशीर्वाद द्यावा. राज्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणरायाकडे केली आहे. तसेच समस्त गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 'वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!' असं ट्वीट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते मंडळींनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.