Join us

Maharashtra CM: मुख्यमंत्री कोण, यावर रखडले होते पाठिंब्याचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 5:33 AM

मुख्यमंत्री कोण होणार, यावर शिवसेनेमध्ये वेगवेगळी नावे समोर येत होती.

मुंबई : मुख्यमंत्री कोण होणार, यावर शिवसेनेमध्ये वेगवेगळी नावे समोर येत होती. मात्र मातोश्रीवरून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले होते. देशातला सगळ््यात तरुण मुख्यमंत्री अशी त्याची नोंद व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु वर्तमान राजकीय परिस्थितीत संसदीय कामकाजाचा पूर्वानुभव नसलेल्या आदित्य यांना मुख्यमंत्री करणे अडचणीचे होईल, अशी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. त्यासाठीच पाठिंब्याचे पत्र देण्यास विलंब केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.सोमवारी सायंकाळी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात बोलणे झाले. तुम्ही तुमचे पत्र दिले का अशी विचारणा सोनिया गांधी यांनी केली. तेव्हा पवार यांनी आम्ही अद्याप पत्र दिले नसल्याचे सांगितले. काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी व्हावे अशी भूमिका पवार यांनी पुन्हा मांडली. त्यावर सोनिया गांधी यांनी काँग्रेस जर सहभागी होत असेल तर काँग्रेसची भूमिका काय असेल अशी विचारणा केली. त्यावर, या गोष्टी समक्ष चर्चेतून ठरवता येतील असे उत्तर पवार यांनी दिले. सविस्तर चर्चेसाठी दिल्लीहून काँग्रेस नेते मुंबईला पाठविण्याचा निर्णय झाला.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेशरद पवार