उद्धव ठाकरे शपथविधीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'उज्ज्वल' शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 07:59 PM2019-11-28T19:59:51+5:302019-11-28T20:05:44+5:30
Uddhav Thackeray Oath Ceremony: शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' असे म्हणत महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र उज्ज्वल प्रगती करेल असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनीही उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या बद्दल श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा."
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या बद्दल श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. @OfficeofUT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 28, 2019
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली.
Mumbai: The oath-taking ceremony of Chief Minister Uddhav Thackeray & others concludes. #Maharashtrapic.twitter.com/ShtgPL1OS7
— ANI (@ANI) November 28, 2019
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यांच्यासह सेलिब्रिटींनाही हजेरी लावली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, डीएमके पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, संजय राऊत, मनोहर जोशी, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्यभरातील कार्यकर्ते शिवाजी पार्कवर उपस्थित होते.
#Mumbai: Uddhav Thackeray after taking oath as the Chief Minister of Maharashtra. pic.twitter.com/FWthTdmWaf
— ANI (@ANI) November 28, 2019
विशेष म्हणजे, या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील ४०० शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले. आज दुपारपासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे दादर स्टेशनवर उतरायला सुरू झाले. स्टेशनवर उतरताच या कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने स्टेशन परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. तसेच, तीनही पक्षांचे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय, 'कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', 'जय भवानी, जय शिवाजी', 'आवाज कुणाचा, शिवसेनेचा' असा जयघोष करत हजारो शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर एकच गर्दी केली होती.