Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४,१४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर १०० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 09:00 PM2021-08-16T21:00:28+5:302021-08-16T21:01:27+5:30
Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत ४ हजार १४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे दिवसभरात ५८११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासह कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या आता ६१ लाख ९५ हजार ७४४ इतकी झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९८.८६ टक्के इतकं झालं आहे. तर मृत्यूचा दर २.११ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११८९५ नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ३,५३,१२९ रुग्ण होम क्वारंटाइन तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात सध्या ६२,४५२ सक्रीय रुग्ण आहेत. यात पुणे जिल्ह्यात १४,६१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ६९३८ रुग्ण आहेत. साताऱ्यातही ६,९०९ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या २,९३५ सक्रिय रुग्ण आहेत.