महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा! आज २५ हजारांहून अधिक नवे रुग्ण; मुंबईत भयावह स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 08:38 PM2021-03-18T20:38:42+5:302021-03-18T20:39:11+5:30
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २५ हजार ८३३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १२ हजार ७६४ रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. (Maharashtra Corona Updates 25833 New Cases Today 18 March 2021)
राज्यातील आकडेवारी २५ हजारांच्या पार पोहोचली असताना मुंबईत कोरोनाची भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ८७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत.
Maharashtra reports 25,833 new #COVID19 cases, 12,764 discharges and 58 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) March 18, 2021
Total cases: 23,96,340
Total discharges: 21,75,565
Active cases: 1,66,353
Death toll: 53,138 pic.twitter.com/wFrIFtp73T
राज्य सरकारकडून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २३ लाख ९६ हजार ३४० रुग्णांची नोंद झाली असून यातील २१ लाख ७५ हजार ५६५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर दुर्दैवाने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू ओढवलेल्यांचा आकडा ५३ हजार १३८ इतका झाला आहे. राज्यात सध्या सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीनंही १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आजच्या घडीला १ लाख ६६ हजार ३५३ रुग्ण उपचार घेत आहेत.
एकट्या मुंबईत सध्या १८ हजार सक्रीय रुग्ण
मुंबईत सध्या १८ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाख ५२ हजार ८३५ वर पोहोचला आहे. यातील ३ लाख २१ हजार ९४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृत्यूंचा आकडा ११ हजार ५५५ इतका आहे.