मुंबई : लोकमत नॉलेज फोरम प्रस्तुत आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सहयोगाने ‘महाराष्ट्राचे दशक’ या कार्यक्रमांतर्गत २८ मे रोजी सकाळी ११ वाजता कोविड, औद्योगिक क्षेत्र, आव्हाने आणि संधी या विषयाशी निगडित ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस, इंडस्ट्री आणि अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी, एसएमई चेंबर ऑफ इंडिया अँड महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठ्या आव्हानांना सामोरे जात आहे. हे सर्व केव्हा स्थिर होईल. आपण कधी यशाच्या शिखरावर पोहोचू. महाराष्ट्र कायम अग्रगण्य राहील का, प्लस वन रणनीतीचा आपल्याला फायदा होऊ शकतो का, अशा अनेक मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://live.goliveonweb.com/lokmatknowledgeforum/register.php या लिंकवर नोंदणी करता येईल.