- जमीर काझीमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना प्रमुख चार राजकीय पक्षांनी ६० मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र ‘सबका साथ, सबका विकास’ असे सांगत सर्वाधिक जागा लढविणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मुस्लीम समाजातील एकालाही उमेदवारी दिलेली नाही, तर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मुस्लीम समाजातील दोघांना तिकीट दिले आहे.अधिकृत पक्षांच्या या ६० उमेदवारांशिवाय शंभरहून अधिक मुस्लीम उमेदवार विविध मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी बहुतांश उमेदवार हे एकाच मतदारसंघातून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. विजयापेक्षा प्रमुख प्रतिस्पर्ध्यांची मते खाण्यासाठी ते उपद्रव्य मूल्य ठरणार आहेत.राज्याच्या लोकसंख्येत जवळपास १३ टक्के प्रमाण असलेल्या मुस्लीम समाजातील उमेदवारांचे विधानसभा निवडणुकीतील प्रमाण मात्र अत्यल्प आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांतून एकूण ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १६४ जागा लढविणाºया भाजपने एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही.१२४ जागा लढविणाºया शिवसेनेने कॉँग्रेसमधील ‘आयाराम’अब्दुल सत्तार यांना व कळवा-मुंब््रयातून मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद हिला उमेदवारी दिली आहे. १४४ जागा लढविणाºया कॉँग्रेसने ११ तर राष्टÑवादी काँग्रेसने ४ मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे. त्यामध्ये अनुक्रमे तीन व एक जण विद्यमान आमदार आहे.एमआयएमकडून सर्वाधिक२७ मुस्लीम उमेदवारांना तिकीटराज्यात सहा जागा लढवित असलेल्या समाजवादी पक्षाने प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यासह चार जणांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय राज्यात एकूण ४४ जागांवर निवडणूक लढवित असलेल्या एमआयएमने सर्वाधिक २७ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. त्यापाठोपाठ लोकसभेत त्यांच्यासमवेत निवडणूक लढणाºया अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १४ जणांना तिकीट दिले आहे.याशिवाय शंभरहून अधिक मुस्लिम उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. आता त्यापैकी प्रत्यक्षात किती जणांना विधानसभेत प्रवेश मिळतो, हे २४ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Election 2019 : चार प्रमुख पक्षांकडून ६० मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 1:35 AM