Join us

Maharashtra Election 2019 : मुंबई शहरात ५ उमेदवारांची माघार, ८९ निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 12:43 AM

शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांत एकूण ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यातून पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांत एकूण ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत तिथे सर्वाधिक १३ उमेदवार आहेत. यापाठोपाठ धारावी, सायन कोळीवाडा, भायखळा आणि मुंबादेवी या चार मतदारसंघांमध्ये प्रत्येकी अकरा उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.मलबार हिलमध्ये दहा तर कुलाब्यात आठ आणि वडाळा विधानसभा मतदारसंघांत सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, शिवडी आणि माहिम या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी चार उमेदवार आहेत. याबाबत मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे म्हणाले की, जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी एकूण १०७ उमेदवारांनी १४४ अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत यातील ९४ अर्ज वैध ठरले. त्यापैकी आज पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या ८९ आहे, अशी माहिती शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.माघार घेतलेल्या उमेदवारांची नावेधारावी : पूर्वेश तावरे (महाराष्ट्र क्रांती सेना); वरळी : अमोल निकाळजे (अपक्ष), अंकुश कुºहाडे (अपक्ष), सचिन दयानंद खरात (अपक्ष); मुंबादेवी : अब्बास एफ छत्रीवाला (अपक्ष).

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019