Join us

Maharashtra Election 2019: मतदानासाठी आधार कार्डही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 2:11 AM

Maharashtra Election 2019: निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी आयोगाने अकरा पर्याय दिले आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी आयोगाने अकरा पर्याय दिले आहेत. येत्या सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठीमतदान केंद्रावर आधार कार्डासह अकरा कागदपत्रांच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे.

मतदाराची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारी अथवा सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आधार कार्डमतदान