Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:43 PM2019-10-04T13:43:24+5:302019-10-04T14:01:25+5:30
बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत.
मुंबई - ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरेनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकलेवरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. बिचुकले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अभिजीत बिचुकले निवडणूक लढवणार आहेत. बिचुकले यांनी याआधी विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं म्हटलं होतं. साताऱ्यातील नागरिकांनी शरद पवार यांना मोठं केलं असून मलाही सातारकर मोठं करतील असा अभिजीत यांनी विश्वास व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे शरद पवारांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं देखील अभिजीत बिचुकलेंनी यावेळी सांगितलं होतं.
ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. वरळीतून आदित्य यांना उमेदवारी मिळाल्याने त्याविरोधात मनसे, आघाडीने त्या तोडीचा उमेदवार दिला नव्हता. मात्र आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या या यादीत वरळीतून माजी पोलीस अधिकाऱ्याला उमेदवारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आहे. गौतम गायकवाड असे उमेदवाराचे नाव आहे. गायकवाड हे माजी पोलीस अधिकारी आहेत.
Maharashtra Election 2019 : माजी पोलीस अधिकारी वरळीतून आदित्य ठाकरेंना देणार आव्हानhttps://t.co/AlYsJLCySE#MaharashtraAssemblyElections2019#Vidhansabha2019#ShivSena
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2019
यंदाच्या निवडणुकीच्या या रणांगणात सर्वाधिक लक्ष लागून राहिलं आहे वरळी मतदारसंघाकडे. ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घरातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविणारे आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये आदित्यकडे एकूण 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये 10 कोटी 36 लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे.
आदित्य यांच्याकडे 64 लाख 65 हजार दागिने आणि 20 लाख 39 हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत 6 लाख 50 हजार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. तसेच शिवसेना या पक्षाची ओळख आक्रमकरित्या आंदोलन करणारी संघटना म्हणून होती. अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शिवसैनिकांवर गुन्हे नोंद आहे. राजकीय व्यक्तीवर कोणताही गुन्हा नोंद नाही असं किंबहुना कधी झालेलं ऐकण्यात आलं नाही. मात्र एकमेव आदित्य ठाकरे असे आहेत की त्यांच्यावर आजतागायत एकाही गुन्ह्याची नोंद नाही.