Join us

Maharashtra election 2019 : दिवाळीनंतर 'अयोध्येत दिवाळी', उद्धव ठाकरेंनी मोदींवर चालवला 'राम'बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 8:15 PM

आमच्यापुढे लोकांच्या समस्या, गरिबी, आणि बेरोजगारीचं आव्हान आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भाषण केले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथे महायुतीची सभा पार पडली. प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-सेना सरकारने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आणल्याचं सांगितलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. काँग्रेस उरलीच नसल्याचं सांगून आमच्यापुढे राजकीय विरोधकच नसल्याचे त्यांनी म्हटले.

आमच्यापुढे लोकांच्या समस्या, गरिबी, आणि बेरोजगारीचं आव्हान आहे. मोदींनी गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामं केली आहेत. महाराष्ट्राच्या विकासात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. कारण, शिवसेनेमुळेच महाराष्ट्राला मजबूत सरकार मिळालं. आज आघाडीच्या नेत्यांकडे बघून शरमेने लाज वाटते. या दिवाळीसोबत अजून एक दिवाळी येत आहे. देशात भगवं वातावरण होत असताना अयोध्येचीही दिवाळी येत आहे. दिवाळीनंतर अयोध्येतही दिवाळी होईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. 

महायुतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उद्धव ठाकरेंनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी राम मंदिराची आठवण करून दिली. यापूर्वी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना राम मंदिरावरुन टोला लगावला होता. ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुंबईत पुन्हा एकदा मोदींवर रामबाण चालवण्याचा प्रयत्न केला आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीशिवसेनाराम मंदिरमुंबई