मुंबई : भाजप-शिवसेनेतील अबोला कायम असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर दरी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.सूत्रांनी सांगितले की, भाजपचे काही नेते, उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे नेतेदेखील भाजप नेत्यांशी फोनवर बोलतात आणि एकत्र येण्याची भावनाही व्यक्त करतात, पण फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी करण्यात यश आलेले नाही.भाजपने प्रयत्न केले, तरीही त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्याच वेळी ते काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची कोंडी फुटण्याची शक्यता सध्यातरी धुसर आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:48 AM