Join us

Maharashtra Election 2019: कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:50 PM

Vidhan Sabha Election 2019 : नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने कोहिनूर 'नांद'ला नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे. 

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीने रम्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधत आहे. भाजपाने यावेळी मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने कोहिनूर 'नांद'ला नाही असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे. 

भाजपाने आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रम्याच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करण्याचे काम सुरु केले आहे. याआधी देखील रम्याच्या माध्यमातून भाजपाने शरद पवार, राज ठाकरे यांच्यावर कार्टून काढत निशाणा साधला होता. यावेळी देखील मनसेस्टाइल खळ्ळ फटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर यांनी पक्षाला रामराम करत हातात शिवबंधन बांधल्याने एका डायलॅागच्या माध्यमाने टीका केली आहे. या कार्टूनमध्ये एक कोहिनूर को हम काश फिसलने से रोक पाते, अच्छा होता अगर हम अपनी ही निंद से जल्दी जाग जाते असं म्हणत भाजपाने राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आदित्यसाठी 'मनसे'नं मतदारसंघ सोडला, तर उद्धव ठाकरेंनी 'राज' समर्थक फोडला

नितीन नांदगावकर आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नितीन नांदगावकरांनी ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019