महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 11:55 AM2019-11-01T11:55:24+5:302019-11-01T11:58:47+5:30

शिवसेना-भाजपामध्ये चर्चा योग्य दिशेनं जाऊन प्रश्न सुटावा हे महत्त्वाचं आहे.

Maharashtra Election 2019: bjp to warned shivsena on maharashtra government form | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना-भाजपामध्ये चर्चा योग्य दिशेनं जाऊन प्रश्न सुटावा हे महत्त्वाचं आहे. शिवसेना-भाजपामधला पेच सुटला पाहिजे. मुख्यमंत्री हे स्वतःला शिवसैनिकच मानतात, चर्चेतून प्रत्येक प्रश्न सुटणार आहे. 50-50च्या फॉर्म्युलाचा तिढा हा चर्चेतून सुटणार आहे. ठरावीक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. तर राष्ट्रपती शासन आणावं लागेल.

मुंबई- विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळावा, यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळतेय. सत्तास्थानांच्या समान वाटपावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झालाय. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असं म्हणत भाजपाला चिमटा काढला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली. 

शिवसेना-भाजपामध्ये चर्चा योग्य दिशेनं जाऊन प्रश्न सुटावा हे महत्त्वाचं आहे. शिवसेना-भाजपामधला पेच सुटला पाहिजे. मुख्यमंत्री हे स्वतःला शिवसैनिकच मानतात, चर्चेतून प्रत्येक प्रश्न सुटणार आहे. 50-50च्या फॉर्म्युलाचा तिढा हा चर्चेतून सुटणार आहे. चर्चेतल्या मुद्द्यांच्या आधारावर अटीशर्थी घातल्या जातात. सर्वकाही चर्चा कशी होते, त्यावर ठरत असतं. तसेच येत्या काही दिवसांत 100 टक्के नवीन सरकार सत्तेवर येणार आहे, ठरावीक कालावधीत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. तर राष्ट्रपती शासन आणावं लागेल. महाराष्ट्रानं त्याग अन् सेवा शिकवली आहे. अशा महाराष्ट्राच्या हिताचा हा प्रश्न चर्चेतून नक्कीच सुटेल, असा विश्वासही सुधीर मुनगंटीवारांनी केला आहे. 

 ते म्हणाले, शिवसेना-भाजपाला एकत्रित जनादेश मिळालेला आहे. दोघांनी एकत्र मिळून निवडणूक लढलो आहोत. आमच्या प्रत्येक बॅनर्सवर दोन्ही नेत्यांचे फोटो असतात. दीपावली असल्यानं भाजप-सेनेमधल्या चर्चेला विलंब झाला. दिलेला शब्द हा पाळलाच पाहिजे. सत्ता स्थापनेची चर्चा सुरू करण्यासाठी पुढाकार नक्की घेऊ, कोणत्याही अहंकारानं आपल्याला पुढे जाता येणार नाही. 2014ची निवडणूक सोडली, तर आम्ही एकत्रच लढलेलो आहोत. दोन्ही पक्षांमध्ये अनेक तणावाचे क्षण आले, पण तरीही आमची युती तुटली नाही. हा तिढा कसा सोडवता येईल, यावर निश्चितपणे चर्चा होईल. पेच अन् तिढा सोडवल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. प्रश्न भाजपा अन् शिवसेनेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. जनतेच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युतीचं सरकार यावं हीच भावना आहे. काँग्रेस घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांचा तो मूळ स्वभाव आहे. काँग्रेसनं देशातही अनेकदा सरकारं अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. आधी पाठिंबा देऊन वर्षभरानं ते सरकार पाडायचं हा काँग्रेसचा जुना खेळ आहे, अशी टीकाही मुनगंटीवारांनी काँग्रेसवर केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार; ही तर जनतेची इच्छा''

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहंकार भल्याभल्यांना घेऊन बुडतो; संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणाला?

ठाकरे-फडणवीसांमध्ये तणाव; चर्चेला खीळ, सत्तावाटपाचा पेच कायम

पाच वर्षे सत्ता सांभाळूनही मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर मग कधी मिळणार?

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी? 

Web Title: Maharashtra Election 2019: bjp to warned shivsena on maharashtra government form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.