Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 07:29 AM2019-10-05T07:29:38+5:302019-10-05T07:29:54+5:30

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Maharashtra Election 2019: Chief Minister's wealth increased by 107 percent, Mrs CM's wealth increased by two crore | Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली

Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली

Next

नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातील नोंदीनुसार मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही तब्बल १०७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या नावावर चार प्रलंबित प्रकरणांची नोंददेखील दाखविण्यात आली आहे.

२०१४ साली मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिकरीत्या २३ लाख ३ हजार ६३० रुपयांची जंगम संपत्ती व १ कोटी ८१ लाख १० हजार ५०० रुपयांची स्थावर संपत्ती होती. एकूण संपत्तीचा आकडा हा २ कोटी ४ लाख १४ हजार १३० इतका होता. २०१९ मध्ये हा आकडा ४ कोटी २४ लाख २३ हजार ६३४ वर पोहोचला आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत २ कोटी २० लाख ९ हजार ५०४ रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत ४५ लाख ९४ हजार ६३४ रुपयांची जंगम तर ३ कोटी ७८ लाख २९ हजार रुपयांची स्थावर संपत्ती आहे.

मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात चार प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांची नोंद असल्याचा उल्लेख केला आहे. यात २०१४ साली शपथपत्रात दोन गुन्हे प्रकरणांची नोंद न केल्याच्या प्रकरणाचादेखील समावेश आहे.

त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर २०१४ साली २ कोटी ३० लाख ७१ हजार २०६ रुपयांची संपत्ती होती. ती आता वाढून ४ कोटी ३८ लाख ९७ हजार ७४१ इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत ९०.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांच्या नावावर ३ कोटी ३९ लाख ५८ हजार ७४१ रुपयांची जंगम तर ९९ लाख ३९ हजारांची स्थावर संपत्ती आहे.

प्रतिज्ञापत्रात नमूद केल्या चार खासगी तक्रारी
मुख्यमंत्र्यांनी शपथपत्रात चार खासगी तक्रारींच्या प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा (एफआयआर) दाखल नाही. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खासगी तक्रारींपैकी तीन तक्रारी सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे. सतीश उके यांनी ज्या तीन खासगी तक्रारी केल्या आहेत, त्यापैकी पहिले प्रकरण हे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ‘रेफर बॅक’ झालेले आहे.
हे प्रकरण लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ (अ) अन्वये आहे. दुसरे प्रकरण हेसुद्धा कलम लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२५ (अ) अन्वये असून ती तक्रार उच्च न्यायालयापुढे आहे व यात आरोपनिश्चिती झालेली नाही. सतीश उके यांची तिसरी तक्रारसुद्धा याच कारणासाठी असून, ती नागपूर येथील तदर्थ न्यायालयापुढे असून यातदेखील आरोपनिश्चिती झालेली नाही.

रोख रक्कम रु.१७,५००
ठेवी रु.८,२९,६६६
इन्शुरन्स पॉलिसी रु.१४,००,३१९
चारचाकी वाहन रु.६,००,०००
(महिंद्र एक्सयूव्ही)
मोटारसायकल रु.७,०००
सोने रु.१७,४०,१५०
जमीन रु.५८,४०,०००
(४.९६६ एकर)
घर रु.३,१९,८९,०००
 

Web Title: Maharashtra Election 2019: Chief Minister's wealth increased by 107 percent, Mrs CM's wealth increased by two crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.