Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 05:14 AM2019-10-11T05:14:15+5:302019-10-11T05:14:49+5:30

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे.

Maharashtra Election 2019: EC issues notice to three candidates in Worli | Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

Next

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या तीन उमेदवारांविरोधात निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. अभिजीत बिचकुले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नाही. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशी उमेदवार अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीने निवडणूक खर्चाच्या नोंदवहीसह तपासणीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. मात्र या उमेदवारांचया नोंदवह्या सादर झाल्या नाहीत. त्यामुळे तिघांविरोधात नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: EC issues notice to three candidates in Worli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.