Join us

शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 1:50 PM

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला

ठळक मुद्देशिवसेना विधिमंडळ गटनेतेपदाची माळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनंही आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली असून या पदाची माळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज सेना आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. दिंडोशीचे आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सुनील प्रभू यांचीही पुन्हा पक्षाचे प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.

भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'

''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन सात दिवस उलटले, दिवाळीही होऊन गेली, तरी भाजपा-शिवसेना या दोन भावांमधील सत्तास्थापनेचा तिढा सुटायला तयार नाही. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला, मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, मंत्रिपद वाटपाची समीकरणं याभोवतीच राज्याचं राजकारण फिरतंय. या दरम्यान, भाजपा आणि राष्ट्रवादीनं काल आपापले विधिमंडळ गटनेते निवडले. भाजपा आमदारांच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून अजित पवार यांची निवड झाली. म्हणजेच, भाजपाने सत्ता स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री असतील आणि महाआघाडी विरोधी बाकांवर बसल्यास अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. 

जिल्ह्यातील विरोध मावळणार ? विनायक मेटेंचा मंत्रीपदाचा मार्ग होणार मोकळा

जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवाने शिवसेनेचा मनसुबा फसला

त्यानंतर आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आलं. त्यांच्या नावाचा प्रस्ताव, पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांनी मांडणं सूचक मानलं जातंय. अर्थात, या बैठकीत सत्तास्थापनेबाबत काय चर्चा झाली किंवा शिवसेना नेतृत्व भाजपाच्या प्रस्तावांवर काय विचार करतंय, याबाबत काही समजू शकलेलं नाही.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाआदित्य ठाकरेएकनाथ शिंदे