Maharashtra Election 2019 : दहा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:33 AM2019-10-11T01:33:25+5:302019-10-11T01:33:40+5:30

शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी नेमलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांसोबतच संबंधित विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Maharashtra Election 2019: EVM process for ten constituencies completed | Maharashtra Election 2019 : दहा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Maharashtra Election 2019 : दहा मतदारसंघांसाठी ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Next

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील मतदानासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांसह ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची सरमिसळ प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांसह राजकीय उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे मुंबई शहरात मतदानाच्या दिवशी कोणत्या कर्मचाºयास, कुठल्या विधानसभा मतदारासंघात काम करण्यास जावे लागेल, याची निश्चिती आता प्रशासकीय स्तरावर करण्यात आली आहे.
शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी नेमलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांसोबतच संबंधित विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र (एनआयसी) ने विकसित केलेल्या पोलिंग स्टाफ मॅनेजमेंट सिस्टीम या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ही सरमिसळीची प्रक्रिया करण्यात आली. तृतीय स्तरीय सरमिसळ प्रक्रिया ही प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे. सरमिसळ प्रक्रियेनंतर बैठकीत निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, माहिला अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था, प्रवास व्यवस्था, तसेच मतदान प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठीची घ्यायची काळजी याबाबत सविस्तर सूचना केल्या.

एकूण २ हजार ५९४ मतदान केंद्रे
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये २ हजार ५९४ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात प्रत्येकी किमान पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अतिरिक्त कर्मचाºयांची कुमक तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यकतेपेक्षा किमान दहा टक्के अधिक कर्मचाºयांची आवश्यकता असते. त्यानुसार १७ हजार कर्मचाºयांची द्वितीय सरमिसळ करण्यात आली.

Web Title: Maharashtra Election 2019: EVM process for ten constituencies completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.