Join us

Maharashtra Election 2019: जय-पराजय ठरवणाऱ्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 2:57 AM

Maharashtra Election 2019: पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई : पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशिवाय इतरांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. वर्सोवा, अंधेरी पश्चिम व अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवरील क्षेत्र अधिकाºयांनी मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम सुपुर्द केल्या.

दरम्यान, अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स), अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी एसएनडीटी विद्यालय, जुहू रोड, सांताक्रुझ पश्चिम तर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही गुंदवली महापालिका शाळा, सर मथुरदास रोड, अंधेरी पूर्व येथे होणार आहे.

मतपेट्यांसाठी कडेकोट बंदोबस्त : मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले की, मुंबई शहरातील १० आणि उपनगरांतील २६ अशा एकूण ३६ विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ५३७ ठिकाणी ९ हजार ९९१ बुथवर मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच सर्व मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याभोवती तिहेरी सुरक्षा कवच आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सभोवताली कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019पोलिसएव्हीएम मशीन