विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:26 AM2019-10-05T03:26:39+5:302019-10-05T03:26:59+5:30

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग मधुसूदन अळवणी यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले आहेत.

Maharashtra Election 2019 : Exciting contest in Villeparle, Chandivali, Ghatkopar | विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ

विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपरमध्ये चढाओढ

Next

मुंबई : विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात पराग मधुसूदन अळवणी यांनी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. उमेश सदाशिवराव कांगोकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सनी राजू जैन यांनी भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टीकडून अर्ज दाखल केला आहे.

चांदिवली विधानसभा मतदारसंघात गफ्फार हाजी इब्राहीम सय्यद यांनी अपक्ष, सुनील बाबुराम शुक्ला यांनी युनायटेड काँग्रेस पार्टी, हजरत सरदार पठाण मुलानी व तौफिक अहमद अन्सारी यांनी अपक्ष, विशाल नारायण अडसूळ यांनी बहुजन समाज पार्टी, हर्षवर्धन रामसुरेश पाण्डेय यांनी हिंदुस्थान निर्माण दल, आरिफ नसीम खान यांनी काँग्रेसकडून चार अर्ज, मोहम्मद युसुफ शाह यांनी अपक्ष, सिराजुद्दीन हाफिजुल्लाह खान यांनी आम आदमी पार्टी, अबुल हसन खान यांनी वंचित बहुजन आघाडी, दिलीप लांडे यांनी शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल केले आहेत. घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात प्रमोद सोपान गायकवाड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, आता दाखल एकूण अर्जांची संख्या ९ झाली आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, आता दाखल एकूण अर्जांची संख्या २६ झाली आहे.
घाटकोपर (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी १५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून, आता दाखल एकूण अर्जांची संख्या १७ झाली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Exciting contest in Villeparle, Chandivali, Ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.