मुंबई: राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, सत्तेतला आमदार काही करु शकत नाही, विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज असल्याचे सांगत मनसेप्रमुखराज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. तसेच प्रत्येक प्रचारसभेत राज ठाकरे विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन करत आहेत. यावर माजी विरोधी पक्ष नेते व भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत तुमचं उदाहरण देऊन सांगत आहेत की विरोधी नेताचं सरकारमध्ये गेल्याने अशा पक्षाला विरोधी पक्ष पद देऊन काय उपयोग असं सांगत विरोधी पक्षासाठी संधी मागत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज ठाकरे विरोधी पक्षाची भूमिका मांडताय ती योग्य आहे. कारण सभागृहात राज्यातील एकही माजी मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष कोणतेचं प्रश्न मांडताना दिसत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी कधाचीत हे विधान केलं असावं असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मी आज सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी मागणी होत आहे. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन प्रत्येक सभेत करण्यात येत आहे.