Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:49 AM2019-10-04T03:49:15+5:302019-10-04T03:49:23+5:30

विद्यमान आमदारांची २०१४ मध्ये असलेल्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे.

Maharashtra Election 2019: Great increase in the wealth of the existing MLAs | Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ

Maharashtra Election 2019 : विद्यमान आमदारांच्या संपत्तीमध्ये भरीव वाढ

Next

मुंबई : विद्यमान आमदारांची २०१४ मध्ये असलेल्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे.गुरुवारी शिवसेनेच्या चेंबूर, कुर्ला ,कलिना येथील आमदारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चेंबूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी अर्ज भरला आहे. तर कुर्ला विधानसभामधून गुरुवारी एकमेव अर्ज आला तो विद्यमान आमदार मंगेश कुडाळकर यांचा आहे. कलिना विधानसभेतून आमदार संजय पोतनीस यांनी अर्ज केला आहे. त्यासोबत मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आमदार प्रकाश फातर्फेकर यांची २०१४ मध्ये ७, ६१,२२० रुपयांची संपत्ती होती. गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये पाच पट वाढ झाली असून २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ३८,६६,५८० रुपये झाली आहे. त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. कुर्ला विधानसभा क्षेत्रातून महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांनी अर्ज दाखल केला. यामध्ये २०१४ साली त्यांच्या नावे ३,६१,०८१ रुपयांची संपत्ती होती. या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात आठपट वाढ झाली असून २०१९ मध्ये हि संपत्ती २७,४७,९५४ रुपये झाली आहे.त्यांच्या नावावर ९,४७,५८७ रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ७७,८२,४९४ रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये कुडाळकर यांच्याकडून त्यांच्या पत्नीने १७ ,३५,००० रुपयांचे कर्ज घेतले आहे.

तर कलिना विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय पोतनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दिलेल्या घोषणापत्रात २०१४ साली त्यांची संपत्ती ६,७६,१९० होती. २०१९ मध्ये हि संपत्ती २८,३१,२८० झाली आहे. त्यांच्यावर १६,९१,००७ रुपयांचे कर्ज आहे

Web Title: Maharashtra Election 2019: Great increase in the wealth of the existing MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.