Join us

Maharashtra Election 2019: करवीरमध्ये सर्वाधिक ८३.९३ टक्के; कुलाब्यात कमी ४०.११ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 4:28 AM

Maharashtra Election 2019: पुणेकरांनी मतदानाला मारली दांडी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६१.१३ टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक ८३.९३ टक्के मतदान करवीर मतदार संघात, तर कुलाब्यात सर्वात कमी ४०.११ टक्के मतदान झाले. लोकसभेप्रमाणे या वेळीही बहुसंख्य पुणेकरांनी मतदानच न केल्याने पुण्यातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

मतदानाची अंतिम आकडेवारी गोळा करण्याचे काम निवडणूक आयोगात मंगळवारी रात्री उशिरा सुरूच होते. मिळालेल्या जिल्हानिहाय माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. सलग तीन दिवस पाऊस असूनही कोल्हापूरकरांनी ईर्षेने मतदान केले. कागल मतदार संघात तर रात्री नऊ वाजेपर्यंत रांगा होत्या. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत ६७.१५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मतदारांचा निरुत्साह दिसला. 

४ हजार ईव्हीएम नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी

प्रत्यक्ष मतदानाच्या काळात ४ हजार ६९ ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये ६६५ बीयु , ५९६ सीयु आणि ३ हजार ४३७ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्या. नादुरुस्त झालेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट त्वरित दुरुस्त करण्यात आल्या. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

टॉप फाइव्ह

करवीर ८३.९३%, कागल ८१%, शाहूवाडी ७९.९० %, शिराळा ७६.७८%, रत्नागिरी ७५.५९ %

सर्वात कमी

कुलाबा ४०.११%, उल्हासनगर ४१.२०%, कल्याण प. ४१.९३%, अंबरनाथ ४२.४३%, वर्सोवा ४२.६६% पुणे कँटोन्मेंट ४२.६८%.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदान