महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री वैद्यकीय अन् साहाय्यता निधी कक्ष बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 05:05 AM2019-11-15T05:05:59+5:302019-11-15T05:06:07+5:30

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आरोग्य व अन्य प्रकारच्या अडचणीत मदत दिली जात होती.

Maharashtra Election 2019: mantralay Chief Medical and Assistance Fund Room closed | महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री वैद्यकीय अन् साहाय्यता निधी कक्ष बंद

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्री वैद्यकीय अन् साहाय्यता निधी कक्ष बंद

Next

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना आरोग्य व अन्य प्रकारच्या अडचणीत मदत दिली जात होती. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच हे दोन्ही कक्ष बंद करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची स्थापना १७ मार्च २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचे ओएसडी म्हणून ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

साडेचार वर्षांत गरजू रुग्णांना तब्बल ६०० कोटी रुपयांची मदत दिली गेली. तसेच नामवंत ४०० रुग्णालयांमध्ये लाखो रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि त्याद्वारे ९०० कोटी रुपयांची मदत करण्यात आली. बुधवारपासून हे कक्ष बंद झाल्याने लोकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सातव्या माळ््यावरील कार्यालयास टाळे लावण्यात आले असून तेथील कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागात परत पाठविण्यात आले आहे.
>राज्यपालांना साकडे
नियमावर बोट ठेऊन हा कक्ष बंद केला गेला पण एका तांत्रिक कारणामुळे हजारो रुग्णांना फटका बसणार आहे. दुसºया एखाद्या नावाने हा कक्ष सुरू ठेवता आला असता असे सामजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे दोन्ही कक्ष तातडीने सुरू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: mantralay Chief Medical and Assistance Fund Room closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.