मुंबई - माझा प्रगतीला विरोध नाही, मी प्रगतीच्या कधीही आड येत नाही. पण, हे प्रगतीच्या नावाखाली कित्येक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार, असे म्हणत राज ठाकरेंनी मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांवरुन सरकारवर जबरी टीका केली. राज यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत, देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, औद्योगिकीकरण, शेतकरी, यांसह विविध क्षेत्रांमधील सद्यस्थितील घडामोडींवर भाष्य केले.
मुंबईतील प्रभादेवी येथे राज यांची सभा पार पडली. या सभेत राज यांनी सेना-भाजपा सरकारसह नागरिकांनाही खडेबोल सुनावले. मेट्रोला माझा विरोध नाही. पण, शहरात गर्दी होऊ नये, शहरातून गर्दी बाहेर जायला पाहिजे, यासाठी प्रयत्न होत नाहीत. पण, शहरात गर्दी वाढण्यासाठी प्रयत्न होतोय. मेट्रोसाठी तुम्हाला आणि तुमच्या आरेच्या जंगलातील झाडांनाही कापलं जातंय. मी पर्याय दिला होता, पण ऐकतंय कोण?. एका रात्रीत 2700 झाडे कापली आहेत, त्यापैकी केवळ 44 झाडे उरली आहेत. काय चाललंय हे? असे म्हणत राज यांनी सरकारवर जबरी टीका केली.
रात्रीच्यावेळी झाडा-फुलांना हात लावू नये, असे हिंदू-संस्कृतीत सांगितलं जातं. पण, सरकारने एका रात्रीत झाडांची कत्तल केलं, विशेष म्हणजे न्यायालयानेही रात्रीच निर्णय दिला. 'आरे'तील झाडांची कत्तल पाहून मला रमन राघव हा खुनी आठवला. तोही रात्रीच्या अंधारात येऊन खून करून जायचा. आरेतील झाडांबाबतही सरकारने तसंच केलंय. मी व्यंगचित्रकार असल्याने मला हा संदर्भ इथं द्यावासा वाटला.
राज यांच्या सभेतील मुद्दे
आता जे चालू आहे ते रशियाच्या मार्गावर..अनेक उद्योगपती बाहेर जात आहेत.. आमच्याकडे नुसत्या निवडणुका सुरू आहेत. 33 टक्के कर देशाला देत आहोत. पेट्रोल डिझेलची सर्वाधिक किंमत महाराष्ट्र मोजत आहेत. तुमच्याकडून पैसे काढून मोबदल्यात काय मिळतेयचांगले रस्ते नाहीत, टोल सुरूभाजप टोलमुक्त महाराष्ट्र करणार होते. सरकार आले तरी टाेल सुरू.. आता दहा रूपये थाळी म्हणताय निवडून आल्यानंतर शंभर रूपये थाळीवचननामा म्हणजे शब्द.. शब्द पाळू शकत नसाल तर जाळून टाकायांची सत्ता महापालिकेत असेपर्यंत खड्डे संपणार नाहीत.रस्ते बनविल्यानंतर त्यावरील खड्डे भरण्यासाठी पुन्हा दोनशे काोटींचे खर्च महापालिका करीत असते.