Join us

Maharashtra Election 2019: महामुंबईच्या मतटक्क्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 5:44 AM

Maharashtra Election 2019: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे.

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील ६७ मतदारसंघांपैकी ४४ मतदारसंघांतील मतदारांनी मागील वेळेपेक्षा निरूत्साह दाखवल्याने मतांच्या टक्क्यात घसरगुंडी झाली आहे. तिचा फटका कोणाला बसतो आणि फायदा कोणाच्या पारड्यात पडतो, या शक्यतेने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

सलग सुट्टया आणि पावसाने मतदानाचा टक्का घसरेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र पावसाने उघडीप दिली, पण मतदानाच्या टक्क्यात फारशी वाढ झाली नाही.उच्चभ्रू वस्त्यांतील मतदार मतदानासाठी उतरला नसल्याने हा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या तुलनेत चाळी, झोपडपट्ट्या, ग्रामीण भाग, आदिवासी पट्ट्यातील मतदारांनी नेहमीप्रमाणेच उत्साह दाखवला.

अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये विशेषत: व्हिव्हिपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. मॉक पोलदरम्यान हा प्रकार लक्षात आल्याने लागलीच दुरुस्ती करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019मतदानमुंबई