Join us

सोशल मीडियातही सत्तासंघर्ष; शिवसेनेच्या समर्थनार्थ '#MaharashtraWithShivsena' ट्रेंडिंग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 1:00 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होऊ लागले आहेत.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा वाढलेला असून राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार यावर सगळीकडे चर्चा सुरु आहे. अशातच सोशल मीडियावरही राज्यातील राजकीय स्थितीवर नेटीझन्सकडून भाष्य केलं जात आहे. सध्या #MaharashtraWithShivsena अशाप्रकारचं ट्रेंडिग ट्विटरवर सुरु आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजपाने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली.  शिवसेनेवर जनादेशाचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला. यानंतर लगेचच ट्विटरवरशिवसेना ट्रोल होऊ लागली आहे.

ट्विटरवर #ShivsenaCheatsMaharashtra असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला असून काही तासांत 20 हजारावर ट्विट करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मिम्स व्हायरल केले आहेत. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेस विरोधी, हिंदुत्वाबाबतची वक्तव्ये जोडून ती टाकली जात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओही व्हायरल होऊ लागले आहेत.

मात्र या हॅशटॅगला विरोध करण्यासाठी #MaharashtraWithShivsena अशा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा संघर्ष राज्यात सुरु आहे तसा तो सोशल मीडियावरही सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात गुगलवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्वाधिक सर्च केले गेले आहे. तर त्यापाठोपाठ काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्च केले गेले आहे. विशेष म्हणजे सत्तास्थापनेच्या राजकारणात पवारांनीच सर्व सुत्रे त्यांच्याकडे ठेवली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विटरवर युजर्सकडून  #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी देखील #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग वापरत मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसचं व्हावे असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळं शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संत्तासंघर्ष ट्विटरवर हॅशटॅगच्या माध्यमातून रंगलं असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्नही सुरु असल्याची दिसून येतं आहे.  

महत्वाच्या बातम्या

काँग्रेस कार्यकारणीची बैठक संपली; शिवसेनेला मिळणार काँग्रेसचा 'हात'? 

आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन

भाजपच्या विरोधीपक्षात बसण्याच्या निर्णयावर चित्रा वाघ म्हणतात...

शिवसेनेला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्याची 'अशी' रणनीती; भाजपा कोअर कमिटीची पुन्हा बैठक

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार; शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता

शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा 

भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाकाँग्रेससोशल मीडियाट्विटर