Maharashtra Election 2019 : विधानसभा मतदानासाठी खासगी आस्थापनासह सार्वजनिक सुट्टी; जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:21 PM2019-10-15T20:21:20+5:302019-10-15T20:22:07+5:30
मुंबई शहर जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात सर्व खासगी आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद राहतील. याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाच्या दिवशी त्यांनी 2 ते 3 तासांची सवलत देण्यात यावी. मात्र यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. आस्थापना बंद न ठेवता मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी आल्यास संबंधित आस्थापनेवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आस्थापनातील कर्मचारी अधिकारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित आस्थापनांनी नोंद घ्यावी.