Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 09:59 PM2019-10-04T21:59:49+5:302019-10-04T22:02:59+5:30
मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे.
मुंबई: 'कोहिनूर' प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केल्यापासून मौनात गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे काही बोलायचायं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलेलं असं सागितले होते. मनसेने एकूण 104 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसचं मनसेची विधानसभेची पहिली प्रचार सभा 9 ऑक्टोबरला असून पुण्यातून प्रचारसभेचा नारळ फुटणार आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणतं राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे.
राज ठाकरे विधानसभेसाठी एकूण 15 ते 20 जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहीती समोर आली आहे. यामध्ये पुण्यातून 9 ऑक्टोबरला प्रचारसभेचा नारळ फुटणार असून 19 ऑक्टोबरला ठाण्यात निवडणुकीची शेवटची सभा होणार आहे. तसेच राज ठाकरे मुंबईसह नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील सभा घेणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणूक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी... pic.twitter.com/EjEkjGDGUp
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 1, 2019
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी... pic.twitter.com/yPUlMGFdhb
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 2, 2019
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी... pic.twitter.com/nYsLoWpvIx
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 3, 2019