Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:34 AM2019-10-04T03:34:51+5:302019-10-04T03:35:28+5:30

भांडुप विधानसभामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर सुरू असलेल्या कुरघोडीमध्ये अखेर, विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत, रमेश कोरगावकरांना संधी देण्यात आली आहे.

Maharashtra Election 2019: Ramesh Korgaonkar Shivsena candidate in Bhandup | Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी

Maharashtra Election 2019 : भांडुपमध्ये अशोक पाटील यांना मिळाला नारळ, कोरगावकरांना उमेदवारी

Next

 मुंबई : भांडुप विधानसभामध्ये शिवसेनेच्या पक्षांतर सुरू असलेल्या कुरघोडीमध्ये अखेर, विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत, रमेश कोरगावकरांना संधी देण्यात आली आहे. पक्षाकडून त्यांना ए-बी फॉर्म मिळाल्याने शुक्रवारी ते अर्ज दाखल करणार आहेत.

भांडुपमध्ये अशोक पाटील यांनी उमेदवारी मिळणार, या आशेने प्रचाराला सुरुवात केली होती. त्यांच्या बरोबरीने यंदा विभागप्रमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर भांडुपमधून उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार रिंगणात होते. गेल्या निवडणुकीत आयत्यावेळी
उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांना भाजपने गळ घातली होती. मात्र तो मोह झुगारून ते सेनेतच राहिले.

अन्य भागातील उमेदवारी जाहीर झाली. मात्र, अखेरचा दिवस आला तरी भांडुपमधील सेनेचा उमेदवार कोण असणार? याबाबत संभ्रम कायम होता. ए-बी फॉर्म कुणाच्या हाती पडणार यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू असताना अखेर कोरगावकरांना यंदा पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला. यामुळे पाटील यांना धक्का बसला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Ramesh Korgaonkar Shivsena candidate in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.