Join us

Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या तोंडावर पदाधिका-यांची हकालपट्टी; मुंबई काँग्रेसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 9:23 PM

मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसने पदाधिका-यांच्या हकालपट्टीला सुरुवात केली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना मुंबई काँग्रेसने पदाधिका-यांच्या हकालपट्टीला सुरुवात केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत प्रमुख पदाधिका-यांचा हकालपट्टीचा निर्णय घेण्यात गुरुवारी जाहीर करण्यात आला. अल्पसंख्यांक विभागाचे प्रमुख इब्राहिम शेख यांच्यासह पंधरा पदाधिका-यांना निलंबित करण्यात आले.पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्रभारी अविनाश पांडे यांच्या सूचनेवरून या पदाधिका-यांना निलंबित करण्यात आल्याचे पक्षाचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अल्पसंख्यांक विभाग, महिला काँग्रेस, सफाई कामगार सेलमधील प्रमुख पदाधिका-यांसह मुंबईचे सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षांची नावे यात आहेत.काँग्रेसचा परंपरागत मतदार मानल्या जाणा-या अल्पसंख्यांक समाजातील नेत्यांच्या निलंबनाने पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे समजते. निलंबित पदाधिकारी पुढीलप्रमाणे; इब्राहिम शेख ( चेअरमन, अल्पसंख्यांक विभाग), संजीव बागडी (मुंबई सरचिटणीस), विष्णू ओहाळ (सरचिटणीस, मुंबई काँग्रेस), राजेश रिदलान (अध्यक्ष, सफाई कामगार सेल), पुष्पा अहीर (उपाध्यक्षा, मुंबई महिला काँग्रेस), वैशाली गाला (चिटणीस, मुंबई महिला काँग्रेस), धिरज सिंह (जिल्हाध्यक्ष, उत्तर मध्य युवक काँग्रेस), फहीम शेख (चिटणीस, मुंबई प्रदेश युवक काँग्रेस), अमित भिलवारा (ब्लॉक अध्यक्ष), मेहमूद देशमख, अर्जुन सिंह, गणपत गावकर, पप्पू ठाकूर, किरण आचरेकर,आझाद खान.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019