महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, हीच ती 'गोड बातमी' असेल; संजय राऊतांचा 'इरादा पक्का'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:43 PM2019-11-06T18:43:07+5:302019-11-06T18:55:31+5:30
भाजपानं राज्यपालांना बहुमताचा आकडा दिल्यास आनंदच होईल.
मुंबईः विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 13 दिवस उलटले तरी राज्यात नवं सरकार स्थापन झालेलं नाही. मुख्यमंत्रिपदासह सत्तेतली महत्त्वाची पदं मिळवण्यासाठी सेना-भाजपामध्ये प्रचंड चढाओढ लागली आहे. विशेष म्हणजे जनतेनं बहुमत देऊनही सेना-भाजपानं अद्यापही सत्ता स्थापन केलेली नाही. त्यातच एकमेकांवर दबाव वाढवण्यासाठी दोन्ही पक्ष कुरघोडीचं राजकारण करताना पाहायला मिळतायत.
भाजपानं राज्यपालांना बहुमताचा आकडा दिल्यास आनंदच होईल. राज्यपालांना नुसतं भेटूच नका, 145चा आकडा दाखवून सरका रस्थापनेचा दावाही करा; असा चिमटाही संजय राऊतांनी काढला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो ही गोड बातमी बहुतेक भाजपावाल्यांकडून कळेल, असा टोलाही राऊतांनी सुधीर मुनगंटीवारांना लगावला आहे.
राज्यपालांना आम्हीसुद्धा भेटून आलो. राज्यपालांना रामदास आठवले, महादेव जानकर हेसुद्धा भेटून आले आहेत. राज्यपालांना विनोद तावडेसुद्धा भेटून आले आहेत. राज्यपालांना अजित पवार आणि बाळासाहेब थोरातसुद्धा भेटून आले आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांचं सर्वच मार्गदर्शन घेतात. काँग्रेसच्या आमदारांचं मी कौतुक करतो. त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. शिवसेनेचं सरकार यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत.