मुंबई: सरकारच्या पीक विमा योजनेच्या यंत्रणेत काहीतरी गळबळ झाल्याचे वक्तव्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. शिवसेनेने सत्ताधारी पक्षात असतानाही शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी रस्तयावर उतरुन मोर्चा काढला होता. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी निशाणा साधला होता. मात्र सरकारमध्ये बसूनही रस्त्यावर का उतरलो याचं उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रधानमंत्री फसल विमा योजना चांगला आहे. परंतु या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतच गोलमाल आहे. सरकारला हा गोलमाल थांबवण्यास अपयश आल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच या योजनेत दोन टक्के हिस्सा शेतकरी देतो आणि उरलेलं केंद्र आणि राज्य सरकार देतं. ज्या कंपन्या यासाठी सुविधा देत आहेत, त्यांचा एकही पैसा यात गुंतवता जात असेल असं मला वाटत नसल्याने मला या यंत्रणेत गोलमाल असल्याचे त्यांनी सांगितले.
पाच वर्षे सत्ता राबवल्यानंतरही निवडणूक प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य करणार का, असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंना या मुलाखतीत विचारण्यात विचारण्यात आला. त्यावर ते जर आम्हाला टार्गेट करणार असतील, तर आम्हालादेखील त्यांना टार्गेट करावं लागलं. जर ते आमच्या पाच वर्षांच्या कारभारावर बोलणार असतील, तर आम्हालाही त्यांच्या पन्नास वर्षांच्या नाकर्तेपणावर, किंबहुना भ्रष्टाचारावर बोलावं लागेल. तसेच आम्हाला टार्गेट करत असतील तर आम्ही काय हात जोडून त्यांना सामोरे नाही जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.