मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत; तसतसा प्रचार आणि प्रसाराने जोरदार रणधुमाळी पकडली आहे. प्रत्यक्षात फिल्डवरील प्रचार रंगत असतानाच सोशल मीडियावरही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार करण्यात पकड मिळविली असून, सत्ताधारी पक्षांइतकेच विरोधी पक्षांचे उमेदवारही वेगाने मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. म्हणूनच की काय, सोशल मीडियावर ‘व्होटफॉर’ टेÑडिंगमध्ये असून, दिवसागणिक यात भरच पडत आहे.विलेपार्ल्यात भाजपचे पराग अळवणी, चांदिवलीत काँग्रेसचे नसीम खान, शिवसेनेचे दिलीप लांडे, घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे राम कदम यांनी सोशल मीडियावर प्रचार आणि प्रसारात आघाडी घेतली आहे. ‘बीस साल बेमिसाल’, ‘मेरा काम ही, मेरी पहचान है...’ असे म्हणत नसीम खान यांनी मतदारांचे लक्ष वेधले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रचार यात्रेचे लाइव्ह टेलिकास्टही खान यांच्याकडून केले जात आहे. राम कदम यांनी आपल्या पक्षाचे टिष्ट्वट रिटिष्ट्वट करत विरोधकांवर तोफ डागली आहे. पराग अळवणी यांनी उद्याच्या प्रचाराच्या वेळापत्रकापासून झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्रे अपलोड करत सोशल मीडियावर सक्रिय आहेत़
Maharashtra Election 2019 :सोशल मीडियावरही प्रचाराची रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 4:57 AM