...तर भाजपा नेत्यांनी फोन करावा; अखेर उद्धव ठाकरे चर्चेला तयार, अटी-शर्ती लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 02:29 PM2019-11-07T14:29:07+5:302019-11-07T14:29:35+5:30
'मातोश्री'वर शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काहीसा भावनिक सूर लावत, शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी भाजपालाही आपलं म्हणणं ठासून सांगितलं.
मुंबई - मुख्यमंत्रिपदावर तडजोड होऊच शकत नाही, हे पद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचा निर्णय झालाच नव्हता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यातील चर्चेला खीळ बसली होती. त्यामुळे निकालाला १४ दिवस उलटूनही राज्यात सत्तास्थापनेला मुहूर्त मिळालेला नाही. 'आधी बसू, मग बोलू' अशी भूमिका घेत भाजपानेशिवसेना नेतृत्वाला चर्चेचं आमंत्रण दिलं असतानाच, आता उद्धव ठाकरे यांनीही चर्चेला सशर्त मंजुरी दिल्याचं समजतं.
'मातोश्री'वर शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीसा भावनिक सूर लावत, शिवसैनिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी भाजपालाही आपलं म्हणणं ठासून सांगितलं. मला स्वतःहून युती तोडायची नाही, असं ठामपणे सांगत त्यांनी भाजपाच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे. जे ठरलं ते मान्य असेल तर फोन करा, मी चर्चेला तयार आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
Gulabrao Patil, Shiv Sena MLA after meeting party chief Uddhav Thackeray at Matoshree: We (Shiv Sena MLAs) will be staying at Hotel Rangsharda for next 2 days. We will do whatever Uddhav Sahab asks us to do. pic.twitter.com/LICnhfOozC
— ANI (@ANI) November 7, 2019
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
>> भाजपाने ताठरपणाची भूमिका सोडून द्यावी. जे ठरलं तसं होणार असेल तर भाजप पक्षश्रेष्ठींनी फोन करावा.
>> मला ठरल्यापेक्षा एक कणही जास्त नको, पण मला खोटं ठरवायचं असेल, तर हे योग्य नाही.
>> भाजपाला बाजूला करायचं असं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचं.
>> भाजपा दिलेला शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम. मी माझा निर्णय योग्य वेळी जाहीर करेन.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचं 'युती'बद्दल मोठं विधान; शिवसेनेनं भाजपावर आणखी वाढवला दबाव
नितीन गडकरी 'इन अॅक्शन'; तिढा सुटेल म्हणत शिवसेनेला 'समजावला' मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला!
शिवसेना आमदारांची बैठक संपली; लोकसभेला ठरल्याप्रमाणेच व्हावं हीच भूमिका
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल; 'आकड्यांच्या खेळा'त भाजपाकडून 'शब्दांचा खेळ'
'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'